
सामना ऑनलाईन । मुंबई
लग्न समारंभातील जेवणातून 23 जणांना विषबाधा झाली आहे. वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉलमध्ये हा प्रकार घडला. विषबाधा झालेल्या 23 जणांना तत्काळ व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये 11 पाहुण्यांचा समावेश आहे. लग्न समारंभात जेवल्यानंतर अचानक काही जणांना उलटी आणि मळमळ वाटू लागली. विषबाधा झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचादेखील समावेश आहे. या मुलांसह आठ महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
























































