
मधुमेहाची चाचणी करण्यासाठी अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र सुई टोचून रक्ताद्वारे ही तपासणी करणे थोडे त्रासदायक ठरते. यावर तोडगा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी नवे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या मदतीने फक्त श्वासातून मधुमेहाची तपासणी करणे शक्य झाले आहे.
मधुमेहाच्या तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेणे आवश्यक असते, जी प्रक्रिया वेदनादायक आणि भीतीदायक असते. यावर उपाय म्हणून नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे. या नवीन उपकरणामुळे केवळ श्वासाचे विश्लेषण करून रक्तातील साखरेची पातळी मोजता येणार आहे. पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाने तयार केलेल्या या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाईस’ला यूके डिझाईन नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या संशोधन प्रकल्पात हर्ष तिवारी, डॉ. वर्षा धुर्वे, सबरीन बानो यांच्यासह विविध महाविद्यालयांतील संशोधकांचा सहभाग आहे.





























































