अफगाणिस्तानचे माजी आयटीमंत्री विकताहेत पिझ्झा  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानचे माजी माहिती तंत्रज्ञान ( IT ) मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा विकत आहेत. पिझ्झा कंपनीचा ड्रेस परिधान करून ते जर्मनीच्या लाइपझिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हर करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबरोबर ते देश सोडून जर्मनीला गेले होते. आयटीमंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेलफोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. अलजझिराचा हवाला देत सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या आणि राष्ट्रपती घनी यांच्यात अनेक मुद्दय़ांवर मतभेद होते. राजीनामा दिल्यानंतर ते काही काळ देशात राहिले, परंतु नंतर जर्मनीला आले.