माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात; डॉ. सावंत जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
car-accident

मिरा भाईंदर येथील सगनाई नाका येथे शुक्रवारी सकाळी माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सगनाई नाका येथे डंपर नंबर एम एच 48 ए जी 6866 व कार क्रमांक एम एच 03 बी डब्ल्यू 4224 चा अपघात झाला. या कार मध्ये असलेले माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत जखमी झाले. डॉ. सावंत यांना ॲम्बुलन्स मध्ये बसवून हॉस्पिटलला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.