
सामना प्रतिनिधी । नगर
निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीकरता यंदा महिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला असून चार अॅप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यान्वित करण्यात आले आहेत. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करता येतील. तसेच मतदारांना तक्रारी सुध्दा करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, सीव्हीजनल अॅप, सुगम अॅप, सुविधा अॅप, समाधान अॅप असे अॅपचे प्रकार असून या निवडणुकीमध्ये अॅपचा वापर निवडणुक लढविणारे उमेदवार आणि मतदारांना प्रत्यक्ष निवडणुक कालावधीमध्ये करता येणार आहे. सदर अॅपचा वापर करताना खोटी माहिती अथवा मुद्दाम त्रास देणेच्या हेतुने तक्रार करणे मतदारानी टाळावे, असेही ते म्हणाले.
सीव्हीजलन अॅप यामध्ये आदर्श आचारसंहीतेच्या उल्लंघना बातच्या तक्रारी मोबाईल द्वारे करता येतील, सुगम अॅप हा सभा, हेलिपॅड व इतर विविध अनुशंकाने प्रचाराचे संबंधीत परवाने ऑनलाई पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर सुविधा अॅप हा नामनिर्देशन पत्र आणि प्रतिज्ञापत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी आहे. तर समाधान अॅप हे मतदारांच्या तक्रार निवारण्यासाठी करण्यात आले आहे.
नगर जिल्हयामध्ये नगर व शिर्डी मतदारसंघात क्षेत्रीय अधिकारी तसेच भरारी पथकातील अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांना प्रशिक्षणसुध्दा या अॅपचे देण्यात आले आहे. 375 जण या करीता नियुक्त करण्यात आले होते. मात्र, 149 जण त्या प्रशिक्षणासाठी हजर राहिले. जे अनुपस्थित राहीले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.
नगर जिल्हयात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 23 हजार 261 अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. जिल्हयात 27 हजार 390 कर्मचारी उपलब्ध आहेत. तसेच मतदाना करता जे इव्हीएम व व्हीव्हीपॅड वापरण्यात येणार आहेत. सदर यंत्राचे मॉकपोल घेण्याचे कामकाज सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीत उमेदवारांना ऑफलाईनव ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावे लागणार आहेत. आलेल्या तक्रारी या 24 तासाच्या आत निराकरण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. या कामाजासाठी 48 पथकांची नियुक्ती केली असताना अॅपचे काम लक्षात घेता अधिक कर्मचार्यांची नियुक्ती देखील करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.






























































