अरुणाचलमध्ये पूर आणि दरड कोसळल्याची घटना; 4 कामगारांचा मृत्यू, लष्कराचे 5 जवान बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यात चार कामगारांचा मृत्यू झाला असून, लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. शेजारच्या चौक्यांवरील अनेक बचाव पथके या बचाव कार्यात सहभागी झाली आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सायंकाळी अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना घडली, तर मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे दिबांग व्हॅलीमध्ये दोन निवारा स्थळे वाहून गेली. अप्पर सुबनसिरीमधील ‘केओजारिंग-ब्याचिंग’ रस्ता बांधकामाच्या ठिकाणी दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले.

दिबांग व्हॅली जिल्ह्यात पासू पाणी आर्मी कॅम्पमधील पाचव्या ग्रेनेडियर्सच्या दोन छावण्यांना पुराचा तडाखा बसला. पुरात छावणीतील सात लष्करी जवान वाहून गेले. त्यापैकी दोघांची सुटका करण्यात आली असली असून पाच जण अजूनही बेपत्ता आहेत.