फ्रान्सचा मालीमध्ये एअरस्ट्राईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामिक कट्टरवादी आणि दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा कायम ठेवत फ्रान्सने आफ्रिकन देश मालीमध्ये एअरस्ट्राईक केला. हवाईदलाच्या मिराज लढाऊ विमानांनी मिसाईल हल्ले चढविले. त्यात अल-कायदाच्या 50 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

हवाईदलाने 30 ऑक्टोबरला ही धडक कारवाई केली, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी दिली आहे. 50 दहशतवादी ठार झाले. मोठय़ा शस्त्रसाठय़ांचे नुकसान झाले. स्पह्टके, आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कोट जप्त करण्यात आले असून, चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे.
कट्टरवाद्यांविरुद्ध फ्रान्सचे ऑपरेशन

गेल्या काही आठवडय़ांपासून फ्रान्सने इस्लामिक कट्टवाद्यांविरुद्ध आणि दहशतवाद्यांवर ऑपरेशन सुरू केले आहे. फ्रान्समध्ये कट्टरपंथी तरुणाने शिक्षकाची हत्या केली. त्यानंतर चर्चमध्ये भयंकर चाकू हल्ला केला. या वाढत्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

बाईकस्वार 50 दहशतवाद्यांचा खात्मा, टार्गेट इसिस, अल-कायदा

  • आफ्रिकन देश माली आणि शेजारील बुकाaन फासो आणि नायजर या लहान देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अल-कायदा आणि इसिसने रक्तरंजित हिंसाचार सुरू केला आहे.
  • माली येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेचे सैनिक तैनात आहेत. त्यात फ्रान्सचेही 2500 वर सैनिक आहेत. मालीच्या सीमेवर दहशतवादी असल्याचे फ्रान्सच्या ड्रोन पॅमेराने टिपले. दहशतवाद्यांनी मोठय़ा प्रमाणावर मोटारसायकल जमा केल्याचेही पॅमेरात दिसले. त्यानंतर फ्रान्सने ऑपरेशन सुरू केले.
  • दोन मिराज फायटर जेट आणि मिसाईलवाहू ड्रोनमधून हल्ले करण्यात आले. 50वर दहशतवादी ठार झाले. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी अल-कायदाच्या संबंधित गट अंसार-उल-इस्लामचे आहेत.