
मेष (ARIES – Friday, April 28, 2023)
आपले मत बिनधास्त मांडा. सकाळी घरातील खिडक्या उघड्या ठेवा. मित्रांसोबत पार्टी केल्यामुळे पैसे खर्च होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी मिळून मिसळून वागा. नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंमुळे आनंद होईल. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. जोडीाराकडून आवडती भेटवस्तू मिळेल.
शुभरंग : केशरी
वृषभ (TAURUS – Friday, April 28, 2023)
गरिबांना केशराचा गोड हलवा खाऊ घाला. आपल्यातील दोष काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आवडते पुस्तक वाचायला वेळ मिळाल्याचा आनंद होईल. कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. विना कुणाच्या मदतीने पैसे कमवण्याची युक्ती साधाल. कार्यालयातील कामे वेळच्या वेळी पूर्ण करा.
शुभरंग : आकाशी
मिथुन (GEMINI – Friday, April 28, 2023)
स्वास्थ्य चांगले राहण्याकडे लक्ष द्या. पैशांसोबत पांढऱ्या रंगाच फूल पाण्यामध्ये विसर्जित करावे. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल. घरातील वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. व्यसन टाळा. सकाळी हिरव्यागार गवतावरून चालण्याकरिता वेळ काढाल.
शुभरंग : मोरपिसी
कर्क (CANCER – Friday, April 28, 2023)
प्रिय व्यक्तिला निळ्या रंगाची भेटवस्तू द्या. अनुभवी व्यक्तिला तुमच्या समस्या सांगा. गुपित शेअर करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. एकांतात वेळ घालवावासा वाटेल. जोडीदाराची धाडसी बाजू लक्षात येईल. नातेवाईकांची संकट काळात मदत होईल. व्यायामासाठी वेळ काढाल.
शुभरंग : निळा
सिंह (LEO – Friday, April 28, 2023)
कुत्र्याला पोळी खाऊ घाला. मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. वरिष्ठ कौतुक करतील. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत वाद घालू नका. कार्यालयात नवीन जबाबदारी सोपवण्यात येईल. खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग : रखाडी
कन्या (VIRGO – Friday, April 28, 2023)
निर्णय घेताना परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. नवीन संधी मिळतील. व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन होईल. आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. स्वत:साठी वेळ काढा. आत्मचिंतन करा. धूम्रपान करू नका. आवडता पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळेल.
शुभरंग : काळा
तूळ (LIBRA- Friday, April 28, 2023)
आरोग्य चांगले राहिल. आर्थिक फायदा होईल. कोणाविषयी गैरसमज करून घेऊ नका. सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. मानसिक शांततेचा अनुभव घ्याल. ध्यानयोग करावासा वाटण्याची शक्यता आहे. घरातील फुलदाणी मोरपिसे ठेवा. कुमारिकांना खीर खाऊ घाला.
शुभरंग : मोती
वृश्चिक ( SCORPIO – Friday, April 28, 2023)
गव्हाच्या पिठात गूळ घालून मुंग्यांना खाऊ घाला. समतोल आहार घ्या. घरातील लहान मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊ घ्या. एकांतात राहावेसे वाटेल. जोडीदार आज तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला घेऊन जाण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. गणपतीला जास्वंदाचे फूल वाहा.
शुभरंग : चंदेरी
धनु (SAGITTARIUS -Friday, April 28, 2023)
आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तिला धोतर आणि सोवळं दान करा. संपत्ती योग्य ठिकाणी जतन करून ठेवा. मनाजोगे फळ मिळण्याची शक्यता आहे. सहनशीलता बाळगावी लागेल. स्वत:साठी वेळ काढा. एखाद्या जुन्या मैत्रिणीची अनपेक्षित ओळख होण्याची शक्यता आहे. लोकं तुमचे म्हणणे ऐकतील.
शुभरंग : पिवळा
मकर ( CAPRICORN – Friday, April 28, 2023)
लाल रंगाचे कपडे परिधान करा. आजचा दिवस उत्साही असेल. मनोरंजनाकरिता वेळ आणि पैसे खर्च कराल. बेफिकीर राहू नका. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर लोकांना विश्वासात घ्यावे लागेल. सहकाऱ्यांसोबत जपून व्यवहार करा. दिनचर्या व्यस्त असेल. काचेच्या बाटलीतील पाणी प्या.
शुभरंग : पोपटी
कुंभ (AQUARIUS – Friday, April 28, 2023)
आजचा दिवस आराम करण्याचा आहे. भावंडांची मदत मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. एखाद्या स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाण्याची व्यवस्था करा. तुमच्यावर रुसलेल्या लोकांचा रुसवा दूर होईल.
शुभरंग : नारिंगी
मीन (PISCES – Friday, April 28, 2023)
लहान मुलींना चॉकलेट वाटा. कोणतीही गुंतवणूक करताना घाईगडबड करू नका. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न असेल. कामातील बदलामुळे मन:शांती मिळेल. जोडीदार आज तुमच्या मनासारखे वागेल. आरोग्याची काळजी घ्या. नावं ठेवणाऱ्या लोकांकडे फार लक्ष देऊ नका. घरात एखादे धार्मिक कार्य पार पडण्याची शक्यता आहे.
शुभरंग : किरमिजी































































