विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

कन्याशाळा प्राथमिक शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सामाजीक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्यावतीने मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. कन्याशाळेच्या प्राथमिक शाळेत काही गरीब व होतकरू मुले गणवेशापासून वंचित असल्याची बाब सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते.

बुधवारी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य हेमंत प्रभू, मुख्याध्यापिका श्‍वेता राळकर, स्मिता पवार, ज्योती पाटणकर, श्रद्धा गोसावी, शिवानी करलकर, सुधीर गोसावी, हिमानी गायकवाड, शांती तोंडवळकर, प्रतिभा चव्हाण यांच्यासह अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सौ. खोत यांचे प्रशालेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.