जी-मेलमध्ये आता व्हिडीओ कॉलिंग सेवा मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलने खास जी-मेल युजर्ससाठी व्हिडीओ कॉलिंग सेवा जूनपर्यंत मोफत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉलिंग सेवेसाठी म्हणजेच गुगल मीट सेवेसाठी पैसे भरावे लागणार नाहीत.

गुगल कंपनीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. गुगल मीट सेवा विनाशुल्क 24 तास वापरता येईल. जर युजर्सने ही सेवा 24 तासांपेक्षा जास्त काळ वापरली तर त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षी गुगलने आपल्या व्हिडीओ कॉलिंग सेवेचे नाव गुगल हँगआऊट हे बदलून गुगल मीट असे केले.

तसेच जी-मेल युजर्ससाठी ही व्हिडीओ कॉलिंग सेवा विनामूल्य केली होती. यानंतर गुगल मीट विनामूल्य सेवा मार्च 2021 पर्यंत वाढविली. आता कंपनीने जून 2021 ही सेवा मोफत ठेवण्याची घोषणा केली आहे.