विहिंपचे कोकजे बरळले; शिवसेना राममंदिराचा मुद्दा हायजॅक करत आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेना राममंदिराचा मुद्दा हायजॅक करत आहे अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे बरळले आहेत. कोकजे एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करताना राममंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याची ताकद शिवसेनेकडे नाही, असेही म्हटले आहे. केंद्र सरकारने राममंदिराबाबत अध्यादेश काढायला हवा, कायदा करायला हवा अशी मागणीही कोकजे यांनी केली आहे.