
संगमेश्वर तालुक्यातील गडगडी लघु पाटबंधारे प्रकल्पालगत असलेल्या कुळेवाशी धनगरवाडी व देवोळे घेरा प्रचितगड धनगरवाडी येथील घरांना व जमिनीला भेगा पडल्या असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या ठिकाणी माजी आमदार सदानंद चव्हाण यांची प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. दिल्लीहून आलेल्या भूवैज्ञानिक पथकासमवेत पुढील उपाययोजनेबाबत चर्चा केली. तसेच या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे व पुढील योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सूचित केले.
यावेळी त्यांच्यासोबत जि. प. सदस्या माधवी गीते, माजी सभापती बंडा महाडीक, शिवसेना विभागप्रमुख राजू साळवी, उपसरपंच विनोद इंदुलकर, शाखाप्रमुख सिताराम धनावडे, वाशी उपसरपंच संदीप माने, बोरसुत उपसरपंच विनय खामकर उपस्थित होते.
























































