
उदय जोशी । बीड
माजलगाव मतदार संघात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. कारखानदारांच्या जुगलबंदी ने राजकारण ढवळून निघत आहे. राजकारण तापवले जात आहे ते केवळ मतदार, ऊस उत्पादक शेतकऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी, स्वार्थासाठी हा फंडा वापरला जात आहे असा थेट आरोप केला आहे. शेतकरी संघटनेचे भाई गंगाभीषण थावरे यांनी माजलगाव मतदार संघात कोणी नौटंकी असल्याचा आरोप करत आहे तर कोणी औकात काढत आहे. मात्र या कारखानदाराची औकात शेतकऱ्यांना, मतदारांना माहीत आहे. उसात नागवले, तूर, हरभऱ्यात, लुटले, वाळूत मोठा हात मारला, आता भर दुष्काळात यांना राजकारण आठवत आहे ते फायद्यासाठी. शेतकऱ्याचे लक्ष विचलित करण्याचा हा फंडा असल्याचा आरोप करत भाई गंगाभीषण थावरे यांनी अजून गंभीर आरोप केले आहेत.
सोळुंकेच्या माजलगाव कारखान्यात गाळपासाठी ऊस जात नसल्याने एका शेतकऱ्याने कारखान्याच्या ऑफिस मधेच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तोच कारखाना आता गेटकीन ऊस गाळपासाठी का आणत आहे? गेटकीन उसाचे नेमके गौडबंगाल काय आहे? आपल्या कारखाना हद्दीत ऊस उत्पादक भरडला जात असताना माजी मंत्री प्रकाश सोळुंके सरकारच्या विरोधात दुष्काळावर रस्ता रोको करत आहेत. एकीकडे जय महेश साखर कारखाना शेतकऱ्याच्या उसाला जो भाव देत आहे तो भाव आरोप प्रत्यारोप करणाऱ्याच्या कारखान्याला का दिला जात नाही. दोन वर्षांपूर्वी जय महेश कारखानाने 2600 रु प्रति टनाचा भाव दिला होता तेव्हा यां दोघांच्या कारखान्याने 2000 रु भाव दिला यंदा ही या दोघांच्या कारखाण्यापेक्षा जय महेश कारखाना जास्तीचा भाव दिला आहे. यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आणि शेतकऱ्यावर बोलण्यापेक्षा शेतकऱ्याचा फायदा कशा मध्ये आहे तेवढे बघावे असा सल्ला भाई गंगाभीषण थावरे यांनी माजी मंत्री प्रकाश सोळुंके आणि मोहनराव जगताप यांना दिला आहे.
























































