
दिल्ली महिलांसाठी असुरक्षित शहर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नवीन वर्षाचे जंगी स्वागत झालं आणि दुसऱ्याच दिवशी दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.
सदर घटना दिल्लीतील सदर बाजार परिसरात घडली आहे. 1 जानेवारी रोजी चहावाल्याने कचरा वेचणाऱ्या महिलेला नवीन वर्षानिमित्त एका मुलीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी ती एका 12 वर्षीय मुलीला भेटली आणि ती तिला खुर्शीद मार्केटमधील एका बिल्डींगच्या टेरेसवर कचरा वेचण्यासाठी घेऊन गेली. मुलगी जेव्हा कचरा वेचण्यासाठी गेली तेव्हा चार नराधम तिची वाट पाहत तिथे थांबले होते.
आरोपींनी बिल्डींगमध्ये छोटा तंबू बनवला होता. नराधमांनी पीडितेला जबरदस्ती तंबूमध्ये नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कार करुन झाल्यावर पीडितेला धमकावण्यात आले आणि याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. घाबरेलेली पीडिती दोन दिवस गप्प राहिली, 5 जानेवारी रोजी कचरा वेचण्यासाठी ती सदर बाजारा परिसरात गेली असता तिने तिच्या चुलत भावाला घडलेला घटनाक्रम सांगितला.
चुलत भावाले पीडितेच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींपैकी एक जण चहा विक्रेता आहे. तो मूळ छत्तीसगडचा आहे, तर त्याच्या दुकानात काम करणारे तीन अल्पवयीन आरोपी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. तिन्ही अल्पवयीन आरोपींचे वय अनुक्रमे 12,14 आणि 15 वर्ष आहे. पोलिसांनी चहावाला आणि अन्य तीन आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.




























































