प्रज्ञा शोध परीक्षेत गेवराईचा गौरव जोशी तिसरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष भोसले । गेवराई

गेवराई येथील गौरव किशोर उर्फ हरिभाऊ जोशी याने  महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २०१ गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. असेम्ब्ली हॉल नौरोसजी वाडीया महाविद्यालयात गौरव किशोर जोशी यास या यशाबद्दल धनादेश व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

आयबीएन वृत्तवाहीनीचे प्रादेशिक गट संपादक डॉ.उदय निरगुडकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते गौरवचा गौरव होईल. गौरव जोशी हा गेवराई येथील शारदा विद्या मंदीर या शाळेतुन १०वी इयत्तेतुन उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने पुणे येथे केंब्रीज महाविद्यालयात ११वी साठी प्रवेश घेऊन महाराष्ट्र प्रज्ञा शोध परिक्षेत सहभागी होऊन एकुण २०१ गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. गौरव जोशी याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.