गौतम गंभीर सेल्फ क्वारंटाईन, घरातील सदस्य आढळला कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. गंभीरच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. गंभीरने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मी सेल्फ क्वारंटाईन झालो असून माझ्या कोरोना अहवालाची वाट पहात आहे. मी सर्वांना विनंती करतो की सर्व नियमांचे पालन करा आणि याकडे दुर्लक्ष करू नका. सुरक्षित राहा’, असे ट्विट गौतम गंभीर याने केले आहे.

दिल्लीतील आकडा 4 लाखाच्या पार

दरम्यान, दिल्लीत गुरुवारी रेकॉर्ड 6,700 कोरोना रुग्ण आढळले, तर 66 लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा 4 लाख 16 हजार झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता दिल्लीत यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.