
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ येथे मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी गावातील विविध मागण्यासाठी घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात गावामध्ये पाण्याची पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करावी. शेतकरी व मजुरांच्या हाताला रोजगार हमी सारख्या विविध योजनेतुन काम मिळावे. अंपगासाठी असलेला निधी अपंगाना लवकरात लवकर मिळावा, रमाई योजनेंतर्गत गावामध्ये आलेले घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी राजकुमार सुरवसे, अरुण नांदे, वैजनाथ मायकर, लहु नांदे, गोपीनाथ डबडे, संजय भंडगे, सुभाष नवले, महादेव भालेकर, भारत कणसे, संभाजी भंडगे, उमाकांत बनाळे, पिराजी कोकणे यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले.
या मागण्या मान्य करुन 10 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन सरपंच सौ अनिता जोगदंड व उपसरपंच विश्र्वास कावळे यांनी दिले. गावाला पाणीपुरवठा करणारे ग्रामपंचायतचे विंधन विहिरी व विहितील पाणीसाठा पुर्ण कमी झाल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रायगव्हान येथून पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी ग्रामपंचायत गेली अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. परंतु ही मागणी संबंधित विभागाकडून अद्याप प्रलंबित आहे. ही मागणी जेवढ्या लवकर मान्य होईल तेवढ्या लवकर गावाचा पाणी प्रश्र्न सुटण्यास मदत होईल असे सरपंच सौ अनिताताई जोगदंड यांनी सांगितले.





























































