
भोपाळमधील मॉडेल आणि ‘मिस पुणे’ विजेती ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ट्विशाचा पती समर्थ आणि सासू गिरिबाला सिंह यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सीबीआयने दोन्ही आरोपींची पुढील पोलीस कोठडी मागितली नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 16 जूनपर्यंत भोपाळ सेंट्रल जेलमध्ये पाठवण्याचे आदेश दिले. दोघांनाही तुरुंगात इतर कैद्यांपासून वेगळे ठेवले जाईल.
मंगळवार, 2 जून रोजी समर्थ आणि गिरिबाला यांचा रिमांड संपल्यानंतर सीबीआयने त्यांनी सीजेएम कोर्टात हजर केले. कोर्ट रूममध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार वादविवाद झाला. सुनावणीदरम्यान गिरिबाला यांनी आरोप केला की, ट्विशाचे वकील अनुराग श्रीवास्तव यांनी जबलपूर कोर्टात त्यांचा मुलगा समर्थ याला मारहाण केली होती. यावर अनुराग श्रीवास्तव यांनी उत्तर देताना सांगितले की, जबलपूर कोर्टात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. जर असे घडले असेल तर कोर्टाचे फुटेज काढून तपासणी करावी.
निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार
तपासादरम्यान एक गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. ज्या बेल्टच्या सहाय्याने ट्विशा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली होती, तो बेल्ट घटनेनंतर नियमानुसार सुरक्षित ठेवण्यात आला नाही. घटनास्थळावरून जप्त लिगेचर बेल्ट तपास अधिकारी उपनिरीक्षक दिनेश शर्मा यांना दोन दिवस आपल्या गाडीत ठेवला होता. याप्रकरणी सीबीआय त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे.
























































