लग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार: भेटा येथील प्रकार

854

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील भेटा येथील एका मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भेटा येथील एका तरुणावर भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भेटा येथील कपिल दंडे याने पिडीत मुलीला मोबाईलवर जवळीक साधून गोड बोलून लग्नाचे अमिष दाखवत पिडित मुलीला पळवून नेले. तिच्यावर लातूर येथे अत्याचार केला. तेथून तिला घेवून तो पुण्यात गेला. तेथे राहण्याची सोय झाली नाही म्हणून परत लातूरला आला. लातूर बसस्थानकात सदर मुलीला सोडून तिला गावाकडे जाण्यास सांगितले व नंतर आपण लग्न करू, असे आश्वासन दिले. कोणाला काही सांगू नकोस, माझ्या मनाविरुद्ध वागल्यास भावाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीत औसा बसस्थानकात आली असता दिपक दंडे व हामुलाल कचरु फकीर यांनी तिला दुचाकीवरून गावाकडे नेतो, असे सांगत बोरगाव शिवारात तिचा विनयभंग केला. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.डी. मुळीक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या