
फेब्रुवारी महिना आला की अनेक तरुण-तरुणींना वेध लागतात ते व्हेलेंटाईन्स डेचे. हा दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून अनेकजण प्रयत्न करतात. व्हेलेंटाईन डे वीक सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका सूटकेसमधून गर्लफ्रेंडला नेत असल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकमधील मणिपाल इथला असल्याचा दावा केला जात आहे. येथील एका बॉइज हॉस्टेलवर एक मुलगा एक मोठी सूटकेस घेऊन चालला होता. मध्यरात्री अशाप्रकारे मोठी सूटकेस घेऊन हॉस्टेलच्या बाहेर जाणं थोडं संशयास्पद वाटत होतं.
त्याला हॉस्टेलच्या सुरक्षा रक्षकाने हटकलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली. इतकी मोठी सूटकेस पाहून सुरक्षा रक्षकाने त्याला ती उघडून दाखवायला सांगितली. त्याने ती चाचपडत उघडली. तेव्हा त्यातून एक तरुणी बाहेर पडली.
मुलांच्या हॉस्टेलवर महिलांना परवानगी नसल्याने त्याने ही युक्ती केली होती. पण, दुर्दैवाने तो पकडला गेला. हा व्हिडीओ मणिपाल इथला असल्याचं म्हटलं जात असलं तरीही त्याची निश्चिती झालेली नाही.
पाहा व्हिडीओ-
Lmao I got that video pic.twitter.com/uyxqIFrWx0
— aa-rue (@pleasecanunot) February 2, 2022



























































