
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी कमी होताना दिसले. सुरुवातीला सोन्याच्या दरात तेजी होती, मात्र हळूहळू सोन्याचा भाव पुन्हा कोसळला. दोन दिवसात चांदीचा भावही 700 रुपयांनी खाली आला आहे.
शुक्रवारी बाजारात सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार दिसून आले. इंट्रा डेमध्ये सोने प्रति तोळा 48 हजार 290 रुपयांवर पोहोचले होते, परंतु ही तेजी जास्त वेळी टिकली नाही आणि सोन्याचा भाव 47 हजार 910 रुपयांवर पोहोचला.
8500 रुपयांनी स्वस्त
गेल्या वर्षी कोरोना संकटात शेअर बाजार कोसळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केली होती आणि ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रामसाठी 56 हजार 191 रुपयांवर पोहोचला होता. मात्र गेल्या दहा महिन्यात सोने 8500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
चांदीतही घसरण
गुरुवारी चांदीचा भाव 400 रुपयांनी कमी झाला होता. शुक्रवारीही चांदीच्या भावात घसरण झाली आणि प्रति एक किलोमागे 300 रुपयांची घट झाली. दोन दिवसात चांदी 700 रुपयांनी कमी झाले असून सध्या एक किलोचा भाव 68 हजार 680 रुपये आहे. तसेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव 79 हजार 980 रुपयांवर गेला होता, त्या तुलनेत चांदी 13 हजार 300 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोन्याचा या आठवड्यातील भाव (10 ग्राम)
सोमवार 47,299
मंगळवार 47,684
बुधवार 47,910
गुरुवार 47,721
शुक्रवार 47,700
चांदीचा या आठवड्यातीस भाव (1 किलो)
सोमवार 70,039
मंगळवार 69,512
बुधवार 69,365
गुरुवार 68,962
शुक्रवार 68,680



























































