तंबाखू न दिल्याने आजोबांची कुर्‍हाडीने वार करून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

तंबाखू न दिल्याच्या कारणावरून नातवाने आजोबांवर कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची घटना सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोमनपल्ली येथे घडली. सुभाष मल्लया तंलाडी (२७) असे आरोपीचे तर राजम बुचम तलांडी (७०) रा. सोमनपल्ली असे मृत आजोबाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी आरोपी सुभाष तलांडी याने आजोबा राजम तलांडी यांच्याकडे तंबाखू मागितला. मात्र आजोबा राजम यांनी आरोपी सुभाषला तंबाखू देण्यास नकार दिला. त्यामुळे सुभाषचा राग अनावर झाला. त्याने घरातील कुर्‍हाड घेऊन आजोबांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यामुळे आजोबा राजम हे रक्ताच्या थारोळ्यात पडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची तक्रार फिर्यादी सुनिता मल्लया तलांडी हिने आसरअल्ली पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आसरअल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ३५/१८ कलम ३०२ भांदवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी सुभाष तलांडी याला अटक केली. त्यानंतर आरोपीला सिरोंचा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर दराडे करीत आहेत.