लोनच्या नावाखाली ग्राफिक डिझायनरची बदनामी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोनच्या नावाखाली ठगांनी ग्राफिक डिझायनरची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मालाड येथे ग्राफिक डिझायनर राहतात. त्यांना पैशाची गजर असल्याने ते फेसबुकवर लोन अॅप्सबाबत माहिती सर्च करत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर एक लिंक आली. ती लिंक उघडल्यावर एक अॅप्स उघडले. त्याने ते अॅप्स डाऊनलोड केले. त्या अॅप्समध्ये त्याने त्याची वैयक्तिक माहिती अपलोड केली. त्यांना काही रकमेचे लोन मिळाले. त्यांनी त्या लोनची रक्कम भरली. त्यांना पुन्हा पैशाची गरज असल्याने गेल्या महिन्यात त्यांनी पुन्हा लोनसाठी अर्ज केला. त्यांना 18 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला.

पंपनीने कर्जाच्या 18 हजार रुपयांपैकी फक्त 10 हजार 800 रुपये खात्यात जमा केले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याने 7 हजार 200 रुपये एका खात्यात पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्यांना कर्जाची रक्कम भरण्यासाठी मेसेज आला. ठगांनी त्यांना त्यांची कॉन्टक्ट लिस्ट पाठवून लोनची रक्कम न भरल्यास बदनामी करू अशी धमकी देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यावर न थांबता ठगाने ग्राफिक डिझायनरचे एडिट केलेले पह्टो त्याच्या मित्राला पाठवले. बदनामीचा प्रकार लक्षात येताच त्याने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.