विक्रोळीत मार्गदर्शन मेळावा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान स्काऊट व गाईडसच्या वतीने विक्रोळी येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सचिव पंकज चौरागडे यांनी स्काऊट गाईड यांचे ध्येय, उद्दिष्टये तसेच आपत्कालीन परिस्थितीला कशाप्रकारे हाताळायचे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महादेव शाळेच्या ट्रस्टच्या गिरिजादेवी उपाध्याय, नरेंद्र सक्सेना, जगमोहन जाट, दिशा फाऊंडेशनचे दिनेश बैरिशेट्टी, पूजा दळवी आदी उपस्थित होते.