
पत्नीला गुटखा खाण्याचे व्यसन असल्यामुळे सासरच्या कुटुंबीयांनी सुने विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पत्नी गुटखा खाऊन घरात इकडे तिकडे थुंकत असल्याचा आरोप पतीने केला आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. छट्टा गावातील फुलनदेवीचे (बदलेले नाव) शाहगंज येथील रमेशशी (बदलेले नाव) लग्न झाले होते. लग्न झाल्यावर ती सासरच्या घरी आली त्या दिवसापासूनच फुलनदेवी लपुन गुटखा खात होती. पदराआड लपुन ती गुटखा खाते आणि घरात इकडे-तिकडे थुंकते असा आरोप सासरच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी फुलनदेवीला गुटखा सेवन सोडण्यास सांगितले पण तिने एकले नाही. त्यामुळे पतीने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण कौटुंबीक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले.
पतीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. त्याच्या मोबईलमध्ये अनेक मुलींचे फोन नंबर आहेत. मला मुल होऊ शकले नाही त्यामुळे मला घरातून बाहेर काढले आहे. तसेच, फुलनदेवीने पतीवर आणि सासरच्या मंडळींवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार महिलेला गुटख्याचे व्यसन सोडता येत नसल्यामुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचा निष्कर्ष कौटुंबिक समुपदेशन केंद्राने काढला आहे.
























































