
लातूरमध्ये आज जिवंत हातबॉम्ब सापडले. या बाबत माहिती मिळताच्च पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हे बॉम्ब निकामी केले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
लातूरमध्ये अहमदपूर भागात दिवस रात्र वाहतूकीची वर्दळ असते. कधी कुठला नी कसला प्रकार घडेल याचा नियम नाही. शनिवारी सकाळी नऊ च्या दरम्यान शेतकरी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी महामार्गावरील तलावात गेला असता काही तरी नवीन वस्तू असल्याचे जाणवले आणि येथील पोलीस चौकीस माहिती दिली. ह हातबॉम्ब असल्याचे समोर आले. तात्काळ पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, बीट अंमलदार वैजेनाथ समुखराव, प्रशांत किर्ती, रमेश आलापुरे यांनी संबंधित स्थळास भेट देताच परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन लातुर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक यांना पाचारण करून बॉम्ब निकामी करण्यात आला आहे.



























































