धक्कादायक! पोटच्या मुलीवर बलात्कार करून पित्याने केली हत्या

669

हरयाणात एका नऊ वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर त्या नराधम पित्याने मुलीला विष पाजून तिची हत्या केली. या घटनेनंतर फरार झालेल्या त्या नराधम बापाला पोलिसांनी इंदूर येथून अटक केली आहे.

हरयाणातील रोहतक येथे ही वडिल मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मृत मुलीच्या आई वडिलांमध्ये वाद सुरू असल्यामुळे ते गेल्या सहा महिन्यापासून वेगळे राहत आहेत. या दाम्पत्याला चार मुलं होती. मात्र आई वडिल वेगळे राहायला लागल्यापासून मुलांचे देखील हाल सुरू होते. मुलं दिवसभर आईकडे व रात्री वडिलांकडे राहायची. 27 नोव्हेंबरला मुलगी झोपलेली असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला व तिला मारुन टाकण्याची धमकी देली. वडिलांच्या धमकीला घाबरून मुलीने आईला काहिच सांगितले नाही. मात्र 2 डिसेंबरला त्या नराधम बापाने बाजारातून उंदिर मारण्याचे औषध आणले. ते औषध त्याने मुलीला जेवणातून दिले. त्या रात्रीच त्या मुलीची तब्येत बिघडली व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे तसेच तिला अन्नातून विष दिल्याचे निष्पण्ण झाले. हा अहवाल समोर येताच तिचे वडिल तेथून पसार झाले. मात्र पोलिसांनी त्याला इंदूर येथून अटक केली. याप्रकरणी त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या