
गोल्डन शूटर अभिनव बिंद्रा याच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे. अभिनेता हर्षवर्धन कपूर ही भूमिका साकारत आहे. त्यासाठी हर्षवर्धनची जोरदार तयारी सुरू आहे. हर्षवर्धनने नेमबाजीच्या सरावाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला अभिनवच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तशा कमेंट्सचा वर्षाव त्याच्या पोस्टवर होताना दिसत आहे. अलीकडे, हर्षवर्धनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. अभिनवची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी हर्षवर्धनने त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवला होता. एकूणच त्याची तयारी पाहून चाहत्यांचे लक्ष आता चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागले आहेत.
























































