हातकणंगले- जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पुणे – बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील पथकर नाक्यावर आज शुकशुकाट तर राष्ट्रीय महामार्गही ओस पडल्याचे चित्र होते. जनता कर्फ्यूच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रविवार सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता व काल रात्रीपासून महामार्गावर अडकलेल्या वाहनाव्यतिरिक्त महामार्ग ओस पडला आहे. तर हातकणंगले शहर परिसर, पेठवडगांव शहर व परिसरातील सर्वत्र लोकांनी रस्त्यावर येणे टाळल्याने रस्ते निर्मन्युष्य दिसत आहेत. दरम्यान महामार्गावरील पथकर नाक्यावर पारगांव येथील आरोग्य केंद्राचे पथक, वडगांव व महामार्ग गस्ती पथकाचे पोलीस पथक दिवसरात्र तैनात आहे. एकंदरीत शासनाच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास ऊस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे समाधानकारक चित्र सकाळच्या सत्रात दिसत आहे.