
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
कै. नारायण उर्फ नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्ट शिरोडाच्यावतीने 8 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले. डॉ. राजीव रेडकर व जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या या शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून 18 वर्ष पर्यंतच्या रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार लीलावती हॉस्पिटलमध्येही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

































































