मैदा आणि साखर शरीरासाठी हानिकारक आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैदा आणि साखर हे प्रामुख्याने सफेद पदार्थ (व्हाईट फूड) म्हणून ओळखले जातात. जे पदार्थ रंगाने सफेद आणि प्रक्रिया करून तयार केले जातात ते शरीरास घातक असतात. उदारणार्थ मैदा, साखर, रिफाईंड तेल, ब्रेड.

अनेक पदार्थ जे मैद्यापासून बनवले जातात ते चविष्ट असतात परंतु हे पदार्थ आपल्याला जसं पाहिजे तसे शरीराला उपयोगी पडत नाही. मैदा आणि साखर हे प्रोसेस्ड फूड आहेत तरीदेखील आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही. मैदा आणि साखर यांपासून बनवलेले पदार्थ आपली भूक भागवतात परंतु आपल्या शरीराला योग्य असे प्रोटीन, मिनरल्स काही देत नाही.

मैदा उत्पादक कुशलतेने गव्हापासून पोषकतत्व कडून मैदा तयार करतात. मैदा आणि साखर यांपासून बनवलेले पदार्थ स्वतःचे शरीरात शोषण होण्यासाठी आपल्या शरीराकाडून चांगली पोषणमूल्ये उसने घेतात त्याचा परिणाम आपल्या शरीरात साठवलेली व्हिटॅमिन्स, मिनरल्स कमी होतात. जेव्हा आपण एखाद्या जाहिरातीत बघतो ” परिपूर्ण पीठ ” (enrich flour) याचा अर्थ फक्त एवढाच असतो की त्यातील 10 व्हिटॅमिन्स काढून 2-3 व्हिटॅमिन्स टाकतात.

मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे ( (GI-71) त्यामुळे हे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा दुपटीने जास्त कॅलरी आपण ग्रहण करतो. असे पदार्थ खाल्याने आपल्या रक्त्तवाहिन्यांमध्ये साखरेचे प्रमाण लगेच वाढते आणि अधिक काळ या पदार्थाचे सेवन केले तर जळजळ, इन्सुलिन रेसिस्टन्स आणि शेवटी मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साखरेच ग्लायसेमिक इंडेक्स हा साखर ज्यारूपात आहे त्यावरून ठरते. जसं कि माल्टोस – 105, ग्लुकोज – 100, राईस सिरप – 98, सुक्रोज – 65, लॅक्टोज – 46, फ्रुक्टोस – 19.

जर एखाद्या पदार्थात साखर आहे की नाही हे पाहायचं असेल तर त्या साहित्यात जे पदार्थ ‘ ose’ याने शेवट होतात किंवा काही शब्द ज्यात सिरप किंवा माल्ट लिहिलं असेल तर त्यात साखर आहे हे ओळखावं.

आजकाल जवळजवळ सर्व पदार्थामध्ये मैदा किंवा साखर असतेच त्यामुळे आपण सगळं दुर्लक्षित करू शकत नाही. मात्र त्याचा वापर आपण खूप प्रमाणात कमी करू शकतो. मैद्याऐवजी गहू, बाजरी, ज्वारी, बेसन, सोयाबीन यांचं पीठ आपण वापरू शकतो. गोड खायची ईच्छा झाली तर नैसर्गिक साखर असलेले पदार्थ म्हणजे फळ किंवा दुधात असलेले लॅक्टोज आपण आपल्या आहारात घेऊ शकता.