‘​घसा बसतो’ म्हणजे नेमकं काय होतं? घशाचा त्रास टाळण्यासाठी काय करावे?

बरेचसे आजार हवेद्वारे पसरतात, त्यांना आपण व्हायरल आजार असे म्हणतो. त्यामुळे बहुतेकदा नाक, कान, घसा यांच्या समस्या उद्भवतात. अनेकांना पावसाळा सुरू झाला की जंतूसंसर्गामुळे घसा बसण्याचा त्रास होतो. घसा बसतो म्हणजे नेमके काय? घशाचा त्रास टाळण्यासाठी काय करावे आणि घसा बसल्यानंतर काय काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेऊ या…

घशाला जंतूंचा संसर्ग झाल्यावर लगेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती जंतूंना मारण्यासाठी कार्य करू लागते. या प्रक्रियेत त्याठिकाणी जास्त प्रमाणात पांढऱ्या पेशी जमा होऊन घशाला सूज येते.

सूज आल्याने घशात काहीतरी आहे असे वाटणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, आवाज बदलणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यालाच आपण घसा बसणे असे म्हणतो. यात जंतूसंसर्ग हेच कारण अधिक प्रमाणात दिसून येते.

घसा न बसण्यासाठी काय करायचं?

रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती बळकट असेल तर त्याची तीव्रता कमी राहू शकते. व्यायाम करणे, चांगला आहार घेणे, सर्व भाज्या-फळांचा आहारात समावेश करणे, पुरेसे पाणी पिणे.

घसा बसल्यानंतर काय करावे?

▪️ रुग्णाला दिसणारी लक्षणे पाहून उपचार केले जातात. या काळात रुग्णाने दगदग करू नये, विश्रांती घ्यावी.

▪️ भरपूर पाणी प्यावे, तसेच सूप, आले किंवा गवती चहा घातलेला चहा आणि इतर गरम पेये घेत राहावीत.

▪️ गरम पेयांमुळे घशाला चांगला शेक मिळतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही चांगले राहते.

▪️ घसा बसल्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. पाणी उकळून प्यावे, बाहेरचे अन्नपदार्थ बहुदा टाळावेत.

▪️ घशाच्या विषाणू संसर्गानंतर झालेला जिवाणू संसर्ग 4-5 दिवस बरा होत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना आकाश कोल्हे  यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या