भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण, प्रा. तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर 2 एप्रिलला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसाचार व शहरी नक्षलवादप्रकरणी प्राचार्य आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्याला अटक करू नये म्हणून तेलतुंबडे यांनी हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

शहरी नक्षलवादप्रकरणी पुणे पोलिसांनी प्राचार्य आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना लगेच जामीन मंजूर केला व त्यांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी पुन्हा आपल्याला अटक करू नये म्हणून तेलतुंबडे यांनी हायकोर्टात ऍड. मिहीर देसाई यांच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.

तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज भासल्यास एक लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश यापूर्वीच कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्यासमोर 2 एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.