वादळी पावसाने बीड-परळी मार्ग ठप्प; जिल्ह्यात मोठे नुकसान

1343

परळी ते तेलगाव रस्त्यावर सोमवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान झालेल्या वादळी पावसाने थैमान घातले. वादळ-वावटासह पडलेल्या पावसाने तेलगाव – परळी मार्गालगत असणाऱ्या लहान मोठ्या झाडाला आपल्या कवेत घेतले. यामुळे परळी-बीड राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. हे वादळ इतके मोठे होते की 30-35 किमी च्या मार्गावर आपला तांडव घातला. झाडासह विजेचे खांब पडून तारा तुटल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

या पावसामुळे शेतातील काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे हा वारा एवढा मोठा होता विजेचे मोठे मोठे खांब खाली कोसळले शिवाय रस्त्यालगत असणार्‍या छोट्या-मोठ्या टपर्‍या आणि शेतातील निवारा ही उडून गेला आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील तेलगाव पासून परळी पर्यंत या मार्गावर वादळी पावसाने चांगले थैमान घातले. आत्ताही बीड जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून एकीकडे आधीच सर्वत्र कोरोनाचे दहशतीचे वातावरण असतांना दुसरीकडे आता आस्मानी संकट येऊन उभे ठाकले आहे. तेलगाव, दिंडरूड, सिरसाळा, गोपीनाथ गड, परळी या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या