जालन्यात पावसाने उडवली दाणादाण; उभी पिके पाण्यात, कापसाच्या वाती झाल्या, शेतकरी हवालदील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून परतीचा पाऊस तळ ठोकून असून उभी पिके आडवी झाली आहेत. आधीच संकटाच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा परतीच्या पावसाचे नवं संकट उभं राहिले. कपाशी, सोयाबीन, बाजरी, पिकाला पावसाचा जबर फटका बसला आहे.

अंबड तालुक्यातील ताडहादगाव, शहापुर, वडीगोद्री यासह आदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने कपाशी, बाजरी, तुर, उस, मुग, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास लहरी निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून सत्कारसमारंभामध्ये व्यस्त असणाऱ्या सरकारकडून मदतीच्या अपेक्षेने करतोय.