
सामना प्रतिनिधी ।मालवण
मालवणातत गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी अधिकच वाढला. देवबाग, तारकर्ली, तळाशील किनारपट्टीवर उधणाचा फटका बसला. तर अनेक भागात पाणी भरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
मालवण मसुरे मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर त्याच मार्गावर चांदेर येथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. अन्य काही मार्गावर पाणी आले होते. दिवसभर पावसाचा जोर कायम होता. तर किनारपट्टीवर लाटांचा तडाखा सुरू होता. देवबाग येथे समुद्राचे पाणी वस्तीत घुसले.
पावसामुळे पडझडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर वीज खांब व वीज वाहिन्या कोसळल्या. त्यामुळे शहरासह अनेक गावातील वीजपुरवठा दिवसभर खंडित होता.































































