मुंबईत पावसाची दमदार हजेरी

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबई शहरासह पुर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची संतधार सुरू आहे. पावसाने हजेरी लावलेली असली तरी मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही.

मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी पावसाने सुरूवात केली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुंबई पुर्व उपनगरात 10.07 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पश्चिम उपनगरात 5.1 मिलीमीटर, तर मुंबई शहरात 7.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या