कार्य शिवसेनेचे! दोनशे शेतकरी कुटुंबाना दोन महिने पुरेल इतक्या किराणाचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन, बीड
दुष्काळामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब धास्तावली आहेत. या घाबरलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आवश्यक असलेल्या काही गोष्टींची कुमक मुंबईहून रवाना केली आहे. ही मदत बीड जिल्ह्यात पोहोचली असून या मदतीचे गरजू शेतकऱ्यांना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दोनशे शेतकरी कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढ्या किराणा सामानाची भेट शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे.
महाराष्ट्रावर कोणतेही संकट आले की सर्वात पहिल्यांदा शिवसेना मदतीसाठी धावून जाते. राज्यात भीषण दुष्काळ येणार याचा अंदाज कळताच शिवसेनेने मदत जमवण्यासाठी धावपळ सुरू केली होती.  दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जावू नये अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनापासून इच्छा होती. यासाठी शिवसेनेकडून मदतीचा ओघ दुष्काळग्रस्त भागाकडे सुरू झाला आहे.
शेतकऱ्यांना जेव्हा या किराणा सामानाचे वाटप करण्यात आले तेव्हा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, बाळासाहेब अंबुरे, सुशील पिंगळे, भारत जगताप, बाप्पासाहेब घुगे, मच्छिंद्र काळे, युवा जिल्हाधिकारी सागर बहिर, रामदास ढगे, मशरू पठाण, राजाभाऊ पांडे, नितीन धांडे, महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, चंद्रकला बांगर, रत्नमाला मुंडे, प्रमिलाताई माळी, अलकाताई डावकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमावेळी यावेळी आपासाहेब जाधव, रत्नाकर शिंदे, गजानन मुडेगावकर, व्यंकटेश शिंदे, डॉ.उद्धव नाईकनवरे, संदीप माने, रामराजे सोळुंके, माजी उपनगराध्यक्ष नितीन मुंदडा,  गणेश वरेकर, अर्जुन वाघमारे, योगेश नवले, राजेश विभुते, अशोक आळणे, अनिल बडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.