
कोरोना संसर्गाच्या भीतीने एक हिंदुस्थानी नागरिक तब्बल तीन महिने शिकागो विमानतळावर लपून राहिला. आदित्य सिंह असे त्याचे नाव आहे. जानेवारी 2021 मध्ये बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर गेल्या आठवडय़ात शिकागो येथील कुक काऊंट न्यायाधीशांनी सिंह याला निर्दोष ठरवले. अनधिकृत प्रवेश केल्याच्या आरोपातून त्याची सुटका झाली असली तरी इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कोर्टात हजर रहावे लागणार आहे.
36 वर्षांचा आदित्य सिंह सहा वर्षांपूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत आला होता. पॅलिपहर्नियातील ऑरेंज भागात तो राहत होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तो हिंदुस्थानात परतण्यासाठी निघाला. त्यासाठी तो लॉस एंजेलिस येथून शिकागो येथे आला. शिकागोच्या ओ हारे विमानतळावर तो लपून राहिला. त्याच्याकडे एका विमान कर्मचाऱयाचा हरवलेला बॅज सापडला. त्यानंतर 16 जानेवारीला आदित्य सिंहला पोलिसांनी ताब्यात घेतले. कोरोनाच्या भीतीने विमानतळावर तीन महिने लपून राहिल्याने त्याने पोलीस चौकशीत सांगितले. अनोळखी लोकांनी दिलेले अन्न खाऊन दिवस काढल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर विमानतळाच्या सुरक्षेचे काम करणाऱया द ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनने या प्रकरणाचा तपास केला. सिंगने विमानतळ सुरक्षेचे कोणतेही उल्लंघन केले नाही, तसेच संरक्षित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश केला नाही, अशी माहिती ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनने कोर्टात दिली.



























































