थोडासा गोंगाट लोकांनाही एन्जॉय करू द्या! ध्वनिप्रदूषणाची तक्रार करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘आयपीएल’ सामन्यादरम्यान मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचा दावा करीत याचिका दाखल करणाऱया याचिकाकर्त्याला आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

आयपीएल सामन्यात चौकार-षटकार लगावल्यानंतर अथवा विकेट घेतल्यानंतर क्रिकेटप्रेमींकडून निश्चितच त्याचा जल्लोष होणार. हा थोडासा गोंगाट लोकांनाही एन्जॉय करू द्या, त्यात वावगे काहीच नाही असे सांगत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी याचिककर्त्यांना फटकारले. एवढेच नव्हे तर त्यांची याचिकाही फेटाळून लावली. ही याचिका पेशाने वकील असलेल्या कपिल सोनी यांनी हायकोर्टात 2014 साली याचिका दाखल केली होती.