
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील वसतिगृहांना मातोश्री मुलांचे शासकीय वसतीगृह व मातोश्री मुलींचे वसतिगृह असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शासकीय वसतिगृहे ही केवळ चार भिंतीचा निवारा न राहता, वसतीगृहे हा मुला-मुलींचा आधार आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणारी आधारगृहे असावीत, विद्यार्थ्यांचे शिक्षण सहज व आनंददायी व्हावे, शासकीय वसतिगृहात ठेवताना पालकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा तसेच विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून दूर वसतिगृहात शिक्षण घेत असताना वसतिगृह हे स्नेहभाव व जिव्हाळ्याची ऊब देणारे ठिकाण आहे हा भाव त्यांच्या मनात रुजावा या उद्देशाने मुला-मुलींच्या वसतिगृहांना मातोश्री नाव देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अकृषी विद्यापीठांनाही हा निर्णय लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.





























































