हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा; आम्हाला शूद्र बनवतील, द्रमुक खासदाराच्या विधानानं वाद चिघळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
DMK-MP-TKS-Elangovan-pti

हिंदी भाषेसंदर्भात केंद्र सरकारच्या भूमिकेवरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. आमच्या हिंदी थोपवू नका अशी मागणी दक्षिणेकडील राज्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. द्रमुकचे खासदार टीकेएस एलांगोवन यांनी हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा असल्याचे सांगून भाषेवरून सुरू असलेल्या वादात नवी भर घातली आहे. हिंदी केवळ शूद्रांसाठी आहे, असे म्हणत त्यांनी कथित जातीयवादी टिप्पणीही केली.

आपल्या विधानाला अधिक बळकटी देण्यासाठी टीकेएस एलांगोवन यांनी विविध राज्ये आणि त्यांच्या प्रगतीविषयी तुलना केली. ते म्हणाले, ‘हिंदी ही केवळ बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या अविकसित राज्यांमध्ये मातृभाषा आहे. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब पहा. ही सर्व विकसित राज्ये नाहीत का? हिंदी ही या राज्यांतील लोकांची मातृभाषा नाही’ असंही ते म्हणाले.

ते असंही म्हणाले: ‘हिंदी आपल्याला शूद्र बनवेल. हिंदी आमच्यासाठी चांगले नाही.

एप्रिलमध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदीय राजभाषा समितीच्या 37 व्या बैठकीदरम्यान नवी दिल्लीत सांगितले होते की, ‘इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा स्वीकारली जावी, स्थानिक भाषा नाही.’ अमित शहांच्या या विधानानंतर दक्षिणेकडील राज्यांनी याला जोरदार विरोध केला.