
हिंदू धर्म बदलण्यासाठी नकार दिल्याने एका महिलेची हकालपट्टी केल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. या महिलेसोबत लैंगिक शोषण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील उधमसिंह नगर इथल्या सिडकुल येथे हेल्मेट बनवण्याची कंपनी आहे. येथे कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिलेने नादिर हुसैन आणि अलीम या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषण केल्याचा आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
पीडित महिलेने केलेल्या आरोपांनुसार दोघांनीही हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती. त्यानंतर तिच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणला गेला. तसंच तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. महिलेने धर्म बदलण्यास नकार दिल्यानंतर तिची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर एका आरोपीची चौकशीही करण्यात येत आहे.























































