
संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विस्तीर्ण मैदानावर उद्या ज्वलंत हिंदुत्वाचा गगनभेदी हुंकार घुमणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवार, 8 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ऐतिहासिक सभा होणार आहे. ‘देव, देश आणि धर्म हेच शिवसेनेचे मर्म’ असे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून गर्दीचे सर्व विक्रम ही सभा मोडीत काढणार असल्याचे चित्र आहे.
या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने अवघे संभाजीनगर भगवे झाले आहे. शहराच्या कानाकोपऱयात सभेचे भव्य होर्डिंग्ज लागले असून चौकही भगवे झाले आहेत. शहरातील सर्व रस्ते भगव्या झेंडय़ांनी लखलखून गेले आहेत.
घरोघरी सभेचे निमंत्रण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे निमंत्रण घरोघरी जाऊन देण्यात आले. उन्हातान्हाची पर्वा न करता शिवसेना पदाधिकारी ‘देव, देश आणि धर्मासाठी’ करण्यात येत असलेल्या जागरात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.
स्थळः मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, संभाजीनगर
वेळः सायंकाळी 6 वा.
























































