तिरु मध्यम प्रकल्पात अल्प पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हडोळती

हाळी हंडरगुळी जवळील चिमाचीवाडी येथील तिरू मध्यम प्रकल्पात दिवसेंदिवस पाणी साठा कमी होत असल्याने पाणी कमी होत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्यापुरते पाणी मिळावे या हेतूने पाणी काटकसरीने वापरावे व पाण्याचा अपव्यव्य टाळावा असे प्रशासनाचा वतीने सांगण्यात येत आहे.

1976 साली चिमाचीवाडी गावाजवळ तिरू मध्यम मध्यम प्रकल्प परिसरातील गावाची तहान भागवण्यासाठी उभारण्यात आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता 23.32 दक्षघमी आहे. या प्रकल्पाचे पानलोट क्षेत्र 269.67 चौ.मी. परिघाताने विस्तारलेले आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे 2 हजार 554 हेक्टर्स जमीन ओलीताखाली येते. परंतु यावर्षी अल्प पर्जन्यमानामुळे या प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे या परिसरातील गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार आहे. पाण्यासाठी दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

या प्रकल्पावर आशिया खंडातील सर्वात जूनी व मोठी 47/52 खेडी पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा हडोळतीसह वाढवणा, हाळी, कुमठा या मोठ्या गावांना येथूनच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या प्रकल्पाचा मोठा आधार आहे. या प्रकल्पावर आजूबाजूच्या परिसरातील गावाची तहान भागते. या वर्षी या प्रकल्पात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. आणखी सहा महीने पावसाळा असल्याने नळाला तोट्या बसवाव्यात. पाण्याचा वापर काटकसरीने करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात येईल, असे प्रकल्प अभियंता यांनी सामनाशी बोलतांना सांगितले.