हे करून पहा – पावसाळ्यात डब्यातील डाळी खराब होतात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध प्रकारच्या डाळी डब्यात भरून ठेवण्याआधी उन्हात चांगल्या वाळवून घ्या. त्यातील ओलावा निघून जाईल. त्या प्लॅस्टिकऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात वा बरणीत ठेवा. त्यात तमालपत्र किंवा लिंबाची सुकी पाने टाका.

डाळीवर थोडेसे हिंग किंवा एक-दोन चमचे मीठ टाका किंवा कापडात गुंडाळून ठेवले तरी चालते. डाळ काढताना स्वच्छ आणि कोरडय़ा चमच्याचा वापर करा. डब्यात छोटे सिलिका जेल पॅकेट ठेवले तरी चालेल.