तुमच्याही पुऱ्या तेलकट होतात? जाणून घ्या खुसखुशीत पुरीची युक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

पुरी हा हिंदुस्थानी जेवणातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. कोणतेही गोडाधोडाचे जेवण करायचे म्हटले का पुरी ही केलीच जाते. पुरीचा बेत हा सर्वांनाच आवडतो. मग कुणी, पुरी-भाजी करते. कुणी आमरस पुरी करतात. तर अनेकांना बासुंदी आणि पुरीचा बेत आवडतो. सर्व पदार्थ वेगळे असले तरी देखील पुरी हा पदार्थ मात्र ठरलेलाच असतो. पण, बऱ्याचदा पुरी तेल खूप ओढून घेते आणि तेलकट होते. पण, काही सोप्या गोष्टी अमलात आणल्यास तुम्ही तेलकट नसलेली पुरी तयार करु शकता. आज आपण तेलकट पुरी कशी तयार करायची ते पाहूया..

पुरीचे पीठ अशा प्रकारे मळून घ्या
अनेकदा आपण पीठ मळताना गडबड करतो. पीठ योग्य पद्धतीने मळून घेतले नाही तरीही पुरी तेल ओढून घेते. बरेच जण पुरीचे पीठ मऊसर मळून घेतात. पण, पुरीचे पीठ कधीही मऊसर मळून घेऊ नये. पीठ मऊ मळल्यामुळे पुरी अधिक तेल ओढून घेते आणि पुऱ्या तेलकट होतात. त्यामुळे पुरीचे पठी कधीही घट्ट मळावे. यामुळे तेल अधिक प्रमाणात ओढून घेत नाही. त्यामुळे पुरीचे पीठ घट्टच मळावे.

पीठ झाकून त्याच्या पुऱ्या तयार करणे थांबवा
अनेक जण पुरीचे पीठ मळून ते झाकून ठेवतात. त्यामुळे पुऱ्या मऊ आणि लुसलुशीत होतात. पण, हे फार चुकीचे आहे. कधीही पुऱ्यांचे पीठ झाकून ठेऊन त्याच्या पुऱ्या तयार करु नये. यामुळे पुऱ्या तेल ओढून घेतात आणि तेलकट होतात. त्यामुळे पुऱ्या करताना पीठ मळल्यानंतर लगेचच पुऱ्या करायला घ्याव्यात. यामुळे पुऱ्या तेलकट होत नाहीत.

तेलाची योग्य निवड करा
पुऱ्या करताना तेलाची निवड देखील योग्य पद्धतीने करणे फार गरजेचे आहे. राईस ब्रानसारखे हलके तेल नेहमी तळण्यासाठी वापरावे. यामध्ये कमी तेलात जास्त गोष्टी तळल्या जाऊ शकतात. तसेच तेलाचे तापान देखील योग्य असणे गरजेचे आहे. तेलाचे तापमान मध्यम असावे. जास्त गरम किंवा थंड नसावे.

ही पद्धत वापरुन पाहा
पुरी तळताना कढईत थोडेसे मीठ घालावे, यामुळे पुऱ्या अधिक तेल शोषून घेत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे जास्त मीठ घालू नये, यामुळे पुऱ्या खाऱ्या होऊ शकतात.

 

ure acidity also