हृतिकची सामाजिक बांधिलकी, चित्रपटसृष्टीतील गरजू कामगारांसाठी दिले 20 लाख रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद असल्याने रोजंदारीवर काम करणारे चित्रपटसृष्टीतील कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. अशा कर्मचाऱयांच्या मदतीसाठी अभिनेता हृतिक रोशन याने पुढाकार घेतला आहे. नुकतीच त्याने सिंटा अर्थात सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला 20 लाख रुपयांची मदत केली आहे.

याबाबत सिंटाचे महासचिव अमित बहल म्हणाले, हृतिकने दिलेल्या मदत निधीमधून सिंटाच्या 5 हजार सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच दारिद्रय़रेषेखालील सदस्यांना मोफत रेशन कीट देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतदेखील हृतिकने सिंटाला 25 लाख रुपयांची मदत केली होती. याशिवाय अभिनेता विकी काwशलनेदेखील सिंटाला अडीच लाख रुपयांचा निधी दिला आहे.