अजब! पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवल्याने पतीला 2 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत एक अजब घटना उघडकीला आली आहे. येथे एका पुरुषाला आपल्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा अजब प्रकार कळल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या माणसाचं नाव ट्रॅव्हिस फील्डग्रोव्ह असं आहे. त्याच्या पत्नीचं नाव समांथा केर्शनर असं आहे. या जोडप्याचा विवाह ऑक्टोबरमध्ये झाला होता. वास्तविक या सगळ्याची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती. समांथाने तीन वर्षांपूर्वी तिच्या आईला तिच्या पित्याबद्दल विचारलं होतं. कारण, तिला तिचे वडील कोण हे माहीत नव्हतं. त्यामुळे आपल्या वडिलांना भेटण्याची तिची तीव्र इच्छा होती.

अखेर समांथाच्या आईने फील्डग्रोव्ह हा तिचा जैविक पिता असल्याचं तिला सांगितलं. सुमारे तीन वर्षं समांथा फील्डग्रोव्हसोबत राहत होती. आधी त्यांचे संबंध बाप आणि मुलीसारखे होते. मात्र हळूहळू त्यांचे संबंध बदलले आणि त्यांचं नातं लग्नापर्यंत येऊन पोहोचलं.

अखेर या प्रकाराची तक्रार पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची डीएनए तपासणी केली. त्यात फील्डग्रोव्ह हाच समांथाचा जैविक पिता असल्याचं सिद्ध झालं. आपल्या पोटच्या मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून फील्डग्रोव्हला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.