बायकोसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले, नवऱ्याला 9 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या बायकोशी अनैसर्गिक संबंध ठेवणे आणि तिला मारहाण करणे या गुन्ह्यासाठी एका नवऱ्याला 9 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यातील फास्ट ट्रॅक न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. त्याखेरीज महिलेच्या सासरच्या मंडळींनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, 2007मध्ये लग्न झाल्यानंतर नवरा आणि सासरच्यांचे अत्याचार सुरू झाले होते. त्यात शारीरिक हिंसा, मानसिक त्रास आणि अनैसर्गिक शारीरिक संबंधांचा समावेश होता. पीडितेला हुंड्यासाठीही त्रास देण्यात आला. त्यानंतर तिला मुलगी झाली. तरीही कुटुंबाचे अत्याचार सुरूच होते. 2016मध्ये ती मुलीसह आपल्या माहेरी आली. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर हा खटला न्यायालयात सुरू झाला. त्यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने नवऱ्याला नऊ वर्षांची शिक्षा ठोठावली. अनैसर्गिक प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याला अजिबात माफी देता येणार नाही, असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. त्याच्या आई वडिलांनाही 10 महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. तसंच, त्याच्या बहिणीलाही 10 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.